53 Thousand Farmers Will Get Incentive Benefit of 182 Crores | 53 हजार शेतकऱ्यांना मिळणार 182 कोटीचा प्रोत्साहन लाभ |
नमस्कार मित्रांनो, शेतकरी आई मराठी वरती आपण सर्वांचे स्वागत आहे, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. ती म्हणजे आता 53 हजार शेतकऱ्यांना 180 कोटीचा प्रोत्साहन लाभ मिळणार आहे. चला तर शेतकरी मित्रांनो आपण पाहूया काय आहे. ही योजना व शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ होणार आहे. नियमित कर्जबाड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती या योजना अंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक लाख 84 हजार 556 पात्र शेतकरी असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यात एक लाख 31 हजार 244 जणांची यादी जाहीर झाली आहे. यापैकी 53 हजार 234 आतापर्यंत 182 कोटी 51 लाखाचे प्रोत्साहन अनुदान वर्ग करण्यात आले आहे. 2018/19, 2019/20 तर 2020/21 या तीन वर्षांमध्ये नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे Click करा.
जिल्ह्यात एक लाख 84 हजार 556 लाभार्थ्याची यादी उपनिबंधक या कार्यालयाकडून शासनाकडे पाठवण्यात आली असून त्यानुसार पहिल्या यादी 48 हजार शेतकऱ्यांची नावे आली होती त्यापैकी आता 45000 शेतकऱ्यांना 152 कोटीचे वितरण करण्यात आले आहे. आता शेतकऱ्याच्या दुसऱ्या यादीत 83 हजार शेतकऱ्यांची नावे आली असून ही संख्या आता एक लाख 31 हजार 244 वर पोहोचली असून यापैकी एक लाख 25 हजार 591 शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची केवायसी केली असून त्याच्या खात्यावर अनुदान वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. व तसेच आतापर्यंत 53 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 182 कोटी 51 लाख इतक्या रुपयाचे अनुदान शासनाकडून करण्यात आले आहे. यादरम्यान ही सर्व प्रक्रिया विशिष्ट क्रमांकावर चालते म्हणजेच प्रोत्साहन अनुदान या यादीमध्ये नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला जातो व या संबंधित बँकेत जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची केवायसी केल्यानंतर प्रोत्साहन साठी मिळणारी रक्कम सांगितली जाते व तसेच ती मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते चला तर शेतकरी मित्रांनो पाहूया.