Railway Coach Factory requirement 2023 | रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये मोठी भरती 2023.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे कोच फॅक्टरी येथे विविध पदांच्या 550 जागांसाठी भरती निघाली आहे या भरती करिता पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2023 राहील. चला तर पाहूया विविध पदांविषयी संपूर्ण माहिती
रेल्वे कोच फॅक्टरी (Railway Coach Factory).
पोस्ट -: वेल्डर.
या पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण राहील. आणि उमेदवाराने संबंधित आयटीआय ट्रेड केलेला असावा. या पदाकरिता एकूण जागा 230 राहतील वयोमर्यादा ही 24 वर्षापर्यंत अनिवार्य आहे. आणि अर्जाची शेवटची तारीख ही 4 मार्च 2023 राहील.
पोस्ट -: फिटर.
या पदाकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण तसेच या संबंधित आयटीआय ट्रेड केलेला असावा. या पदाकरिता एकूण जागा 215 राहतील. उमेदवाराचे वय हे 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे राहील. पदा या अर्जाची शेवटची तारीख ही 4 मार्च 2023 आहे.
पोस्ट :- इलेक्ट्रिशियन.
या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असून त्या संबंधित आयटीआय ट्रेड केलेला असावा. या पदाकरिता एकूण जागा 75 राहतील. वयोमर्यादा 24 वर्षापर्यंत आणि अनिवार्य आहे. आणि या पदाकरिता अर्ज करण्यासाठी 4 मार्च 2023 शेवटची तारीख राहील.
पोस्ट -: AC & Ref. मेकॅनिक.
या पदाकरिता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याने या संबंधित आयटीआय ट्रेड उत्तीर्ण केलेला असावा. या पदाकरिता एकूण जागा 15 आहेत. वयोमर्यादा ही चोवीस वर्षांपर्यंत अनिवार्य राहील. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2023 आहे.
पोस्ट -: मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर.
या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असून त्यासंबंधीत आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असायला पाहिजे. एकूण जागा 15 आहेत. प्रत्येक पोस्टसाठी पाच जागा राहतील वयोमर्यादा ही 24 वर्षापर्यंत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2023 राहील.
या सर्व पदांकरिता अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता अधिकृत वेबसाईट ही www.rcf.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर करावी.