Some Simple Ways To Protect Yourself From Lightning Strikes | विज पडण्यापासून स्वतःला वाचवण्याच्या काही सोप्या पद्धती.
विजेपासून आपला अपघात टाळण्यासाठी काय करावे ?
मित्रांनो एकदा पडलेल्या ठिकाणी वीज पुन्हा पडू शकते. आपण शेतामध्ये असतो वातावरण कधी बदलेल आणि वीज कधी पडेल हे सांगता येत नाही. जोराचा पाऊस चालू असताना झाडाखाली उभे राहणे धोक्याचे असते. त्यामुळे आपण एखाद्या झोपडीचा सहारा घ्यावा. झाडाखाली का बसायचं नाही. तर झाडांची पाणही एकमेकात घर्षण होत असतात. आणि त्यामुळे ऋण प्रभार तयार होतो. त्यामुळे धनप्रभाराकडून ऋण प्रभाराकडे वीज आकर्षित केली जाते. वीज पाहून काही लोक पळत सुटले तर काय होते पळताना जमिनीवरील गवत आणि पळणाऱ्या व्यक्ती यांच्यात घर्षण होऊन ऋण प्रभार होतो पडणारी वीज हे धनप्रभाराकडून जमिनीकडे आकर्षित होते. एक गोष्ट म्हणजे वीज पडताना घाबरायचं नाही. आणि तिथून थांबवायचं नाही तर एक दोन पायावर किंवा गुडघ्यावर बसा आणि पायाखाली एक कोरडे लाकूड घ्या. जमिनीला आपल्या शरीराचा कोणत्याच अवयवाच स्पर्श होता कामा नये याची दक्षता घ्यावी. त्यामुळे आपण विज पासून स्वतःचा बचाव करू शकतो. मोकळा मैदानात जास्त प्रमाणात वीज पडू शकते. एका ठिकाणी चार-पाच जण बसले असतील आणि विजा चमकत असेल तर जवळजवळ व्यक्तीमध्ये 15 – 15 फुटांचे अंतर ठेवावे. या सावधानी बाळगल्यामुळे तुम्ही या पद्धतीने विज पासून स्वतःचे रक्षण करू शकता. हा प्रसंग आला तर घाबरून न जाता या प्रसंगांना सामोरे जावे. हे साधे सोपे उपाय केल्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होईल.