Anganwadi Sevika | अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती मध्ये सुधारणा

Anganwadi Sevika – एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडी मधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात आता शासनाने यापूर्वी दिलेल्या आदेश व संदर्भातील क्रमांक एक ते तीन यामध्ये शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयाप्रमाणे एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र ही केंद्र पुरस्कृतिक योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधन कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात शासनाने यापूर्वी दिलेले आदेश व संदर्भाधिन क्रमांक एक ते तीन यामधील शासन निर्णय अधिक्रमित करून खालील विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

थेट नियुक्ती

1)एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यामध्ये ज्या ठिकाणी नवीन अंगणवाड्या सुरू करण्यात येतील अशा ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका व कॉन्टॅक्ट मेंट बोर्ड मध्ये कटक मंडळे समाज कल्याण विभाग शिक्षण विभाग केंद्रीय व राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड यांच्या बालवाड्या सुरू असतील तर अशी बालवाडी बंद करण्यात येऊन जर तेथील बालवाडी शिक्षिका बारावी उत्तीर्ण असेल तर तिला नवीन अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका या बांधणी पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी यासाठी बालवाडी शिक्षिका म्हणून तिची किमान दोन वर्षे सेवा पूर्ण झालेली असावी व अशी बालवाडी अंगणवाडी केंद्रे सुरू करते वेळी कार्यरत असावी. या तरतुदीनुसार खाजगी अथवा स्वयंसेवी संस्थेमार्फत जर कोणी जरी कोणताही विभागाकडून अनुदान मिळत असले, तरीही चालवण्यात येणाऱ्या बालवाडी केंद्रातील शिक्षकांना अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती बाबत विचार करता येणार नाही.

2) मिनी अंगणवाडी केंद्राची अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेश जर ती किमान 12 वी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी.

See also  India Post Office Bharti 2023 | इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023.

3) अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाले असेल अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याचे असेल, तर त्या गावातील (ग्रामपंचायत नव्हे तर महसूली गाव) कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविकेला सेवा जेष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अरहता स्थानिक रहिवाशी अट व मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून दोन वर्षाची सेवा या अटींची पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी. त्या क्षेत्रातील एकापेक्षा जास्त मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव कालावधी समान असल्यास जास्त शिक्षण असलेल्या मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य देण्यात यावे. एखाद्या प्रकरणी अनुभव व शिक्षण समान असल्यास जास्त वय असलेल्या मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य देण्यात यावे.

4) नागरी प्रकल्पामधील कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतीने यांना सेवा जेष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता स्थानिक रहिवासी अट व मदतनीस म्हणून दोन वर्षाची सेवा या अटींची पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

जर एखादा नागरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हा एकाच महानगरपालिका/ नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रामध्ये कार्यरत असेल तर त्या नागरी बालविकास प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाल्यास अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असल्यास त्या संपूर्ण प्रकल्पाच्या अधिनस्त अंगणवाडी केंद्रातील मदतनिसांची एकत्रित सेवा जेष्ठता यादी करून सेवा जेष्ठतेनुसार थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करावी.  तसेच एखाद्या नागरी प्रकल्पामधील महानगरपालिका एकापेक्षा अनेक शहरांची मिळून असेल अशा प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची एकत्रित सेवा जेष्ठता केल्यावर त्या प्रकल्प क्षेत्रातील अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करताना तिला समुपदेशनाद्वारे नियुक्ती पदस्थापना देण्यास बाबतची कार्यवाही करावी.

जर एखादा नागरिक एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हा एकापेक्षा अधिक महानगरपालिका/ नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रामध्ये कार्यरत असेल तर त्या प्रकल्पातील संबंधित महानगरपालिका/ नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाल्यास अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असल्यास संबंधित महानगरपालिका/ नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रनिहाय कार्यरत अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी मदतनीसांची स्वतंत्र सेवा जेष्ठता याद्या करून त्यानुसार थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करावी.

See also  Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिका |

ग्रामीण आदिवासी प्रकल्पाचे बाबतीत स्थानिक शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे समजण्यात यावा ग्रामीण आदिवासी प्रकल्पाचे बाबतीत संपूर्ण महसुली गाव ज्यात वाडी, वस्ती, पाढे यांचा समावेश असेल ते स्थानिक समजण्यात यावे.

अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीचा लाभ देण्यात आल्यानंतर अशा अंगणवाडी सेविकांना त्यांचे निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुज्ञय राहणार नाही.

अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती

Leave a Comment