15 Lakh farmers Deprived of PM Kisan Scheme | PM किसान या योजनेपासून 15 लाख शेतकरी वंचित |
नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबास २०००/- रुपये याप्रमाणे प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो व तसेच या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 13 वा हप्ता देखील दिला गेला आहे योजनेच्या तेराव्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही आता सुरू आहे तसेच केंद्र शासनाने तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार क्रमांकास जोडणे हे बंधनकारक होते परंतु राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी अंदाजे सध्या स्थितीत 14.32 लाख इतक्या शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक हा बँक खात्याशी जोडलेले नाही त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता जमा होणार नसल्याचे कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितले पी एम किसान या योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते आयपीपीबी मध्ये खाती उघडून ती आधार क्रमांक जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावानुसार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांक अशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे तर सर्व शेतकरी मित्रांनो आपण लवकरात लवकर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड नंबर हा लिंक करून घ्यावा.