Agniveer Bharti : अग्निविर भरती २०२३

Agniveer Bharti : भारतीय सैन्यासोबत काम करण्याची इच्छा खुप तरुणांमध्ये आहे परंतु ही संधी कधी मिळते याची वाट युवक पाहत आहेत. आता अग्निपथ योजनेंतर्गत वर्ष 2023-24 च्या नव्या अग्निवीर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

येथे क्लिक करून जाहिरात पहा

अग्निवीर भरतीसाठी 16 फेब्रुवारी म्हणजे आजपासून अर्ज दाखल करता येणार आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यातील तरुणांसाठी वेगवेगळे नोटीफिकेशन जारी केले आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 ही असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समॅन (8वी पास) अशा पदासाठी भरती केली जाणार आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाईदलात सैनिकांची 4 वर्षांसाठी भरती केली जाते. 4 वर्षानंतर 75 टक्के सैनिकांना घरी पाठवलं जाईल. तर राहलेल्या 25 टक्के अग्निवीरांना सैन्यदलात कायमस्वरुपी नियुक्ती केली जाईल. अग्निवीर पदाकरीता वय 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे इतकं आहे.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 250 रुपये भरावे लागतील.

अर्ज भरण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टींकडे लक्ष असावे?

1) मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते आधी तपासून घ्या. जर नसेल तर अर्ज दाखल करण्यापूर्वी नंबर लिंक करून घ्या.

2) तुमचं डिजिलॉकर अकाउंटही बनवा

3) आधारकार्डवरील जन्मतारीख आणि नाव व्यवस्थित तपासून घ्या.

अर्ज करा

See also  EPS 95 higher Pension Yojana 2023 l  EPS 95 वाढीव पेन्शन योजना 2023 अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज.

Leave a Comment