School Updates for 2023 | राज्य शासनाने शाळेच्या वेळामध्ये मोठा बदल केला आहे पुढील वर्षापासून तो लागू केल्या जाईल.
निवासी आश्रम शाळांचे सोमवार ते शुक्रवार करिता सकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांना उठवणे. व प्रातः विधीचा वेळ असणार आहे. तर सकाळी 7:50 मिनिटाला मधली छोटी सुट्टी होणार आहे. 12:20 जेवणाची सुट्टी होईल तर3. 25 मिनिटाला राष्ट्रगीत होईल. आणि शाळेच्या एकूण तासिका नऊ तासिका पूर्ण होतील.
सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये स्पर्धांची तयारी अतिरिक्त तासिका, वाचनालयातील वेळ करीता राखीव वेळ असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे रात्रीचे जेवण 6:30 होईल तर 7:30 ते 9.00 या वेळेमध्ये स्वयं अध्ययन होईल. तर झोपेची वेळ ही रात्री 10:15 ते सकाळी पाच वाजेपर्यंत राहील.
सध्याच्या स्थितीमध्ये शाळा ह्या सकाळी 11 ते सायंकाळचे पाच वाजेपर्यंत असतात परंतु आता नवीन धोरणानुसार पुढील वर्षापासून सकाळी 7.50 ला भरेल व साडेतीन ला म्हणजेच 3.30 ला सुटेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.