Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2023 l नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 महाराष्ट्र.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरित आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर झाले आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाच्या अशा योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजेच नमो शेतकरी महा सन्माननिधी 2023 महाराष्ट्र योजना. आता आपल्या शेतकरी बळीराजाला वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत ते कसे मिळणार पाहूया.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपयांचा सन्माननिधी मंजूर.
1) प्रति शेतकरी प्रति वर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहेत.
2) केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे 6000 रुपये असे 12000 रुपये प्रति वर्ष मिळणार आहे.
3) महाराष्ट्रातील 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे.
4) 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की, नमो शेतकरी महासंघ निधी योजनांमध्ये आपले केंद्र सरकार हे सहा हजार रुपये देत असून त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार 6000 रुपये देणार आहेत. असे शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये प्रत्येक वर्षी त्यांच्या बँक खात्यामध्ये आपले सरकार जमा करणार आहेत. या योजनेबद्दलचे अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.