Aadhaar Card Online Update Download Free Download 2023 | आधार कार्ड ऑनलाइन अपडेट डाउनलोड 2023

Aadhaar Card Online Update Download Free Download 2023| आधार कार्ड ऑनलाइन अपडेट डाउनलोड 2023 मित्रांनो आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख मिळावी यासाठी शासनाकडून प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड च्या माध्यमातून ओळख मिळते. सध्याच्या काळामध्ये आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आधार कार्डच्या माध्यमातून प्रत्येकाची स्वतःची ओळख होते . मात्र ह्या आधार कार्ड दर दहा वर्षांनी अपडेट सुद्धा करावे लागते कारण त्यामधील आपली जी जुनी माहिती आहे ती बदलण्यासाठी आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागते.

तर मित्रांनो आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुमचे आधार कार्ड हे मोफत मध्ये ऑनलाईन अपडेट केला जाणार आहे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. खूप दिवसा आधीपासून तर काही दिवसापूर्वीपर्यंत हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये शुल्क आकारला जात होतं मात्र आता ह्या आधार कार्ड अपडेट ऑनलाइन पद्धतीने मोफत होणार आहे.

मित्रांनो आता 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 पर्यंत तुम्ही जर तुमच्या आधार कार्ड अपडेट केले तरी यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क हा भरावा लागणार नाही कारण तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे ऑनलाइन अपडेट करता येणार आहे. व यासाठी तुम्हाला कसलाही शुल्क भरण्याची गरज नाही. आता तुमचे आधार कार्ड हे मोफत मध्ये अपडेट होणार आहे यासाठी 14 जून ही शेवटची तारीख आहे.

मात्र आपण ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. जर आपण दुसऱ्याकडून ऑनलाईन केले असता आपल्याला पन्नास रुपये असा शुल्क द्यावा लागणार आहे.

मात्र हे आपण स्वतः केले असता आधार कार्ड अपडेट ऑनलाइन पद्धतीने केले असता यासाठी आपल्याला कोणताही शुल्क भरावा लागणार नाही. यासाठी शेवटची तारीख ही 14 जून 2023 अशी आहे. काही दिवसांपूर्वी जर आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचे असेल म्हणजेच त्यामध्ये आपले नाव जन्मतारीख किंवा इतर गोष्टी ह्या बदलायचे असतील तर आपल्याकडून पन्नास रुपयाचा शुल्क घेतल्या जात होता पण आता मात्र हे निशुल्क झाला आहे. आता नागरिक निवांतपणे आपले आधार कार्ड निशुल्क अपडेट करू शकते.

See also  Do these four things before March 31| चार गोष्टी ३१ मार्च आधी करून घ्या अपडेट २०२३ .

मात्र यामध्ये खास गोष्ट अशी आहे जर आपण हेच प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली म्हणजेच आधार सेंटरवर जाऊन केली असता तुम्हाला यासाठी पन्नास रुपयाचा शुल्क भरावा लागणार आहे तर मित्रांनो पुढे पाहूया आपण हे प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी करू शकाल जेणेकरून आपल्याला कसल्याही प्रकारचा शुल्क भरण्याची गरज राहणार नाही.

आपले आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने अपडेट कसे करावे ?

मित्रांनो तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील .

मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी my Aadhar portal वर जावे लागेल .

https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अपडेट आवर ऍड्रेस ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

हे क्लिक केल्यानंतर proceed to update address वर क्लिक करा . यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

यानंतर ज्या व्यक्तीला आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्याचा बारा अंकी डिजिटल आधार कार्ड नंबर हा तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे.

त्यानंतर send OTP या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो तिथे टाकून स्वतःला व्हेरिफाय करा .

त्यानंतर माहिती भरा. असे केल्यावर तुमचे आधार कार्ड हे अपडेट होईल त्यानंतर 14 डिजिटचा यु आर एन हा तुम्हाला मिळेल.

याने तुमचा आधार कार्ड स्टेटस तुम्हाला कळेल.

तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड हे अपडेट करून घ्या व ते ऑनलाईन करा.
धन्यवाद !

 येथे क्लिक करा .

Leave a Comment