Shetakaryane Swtala Gadun Kele Andolan | शेतकऱ्याने स्वतःला गाडून घेऊन केले आंदोलन |

Shetakaryane Swtala Gadun Kele Andolan | शेतकऱ्याने स्वतःला गाडून घेऊन केले आंदोलन :-

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून अनेक वेळा शासनाकडे पाठपुरवठा पुरवठा केला परंतु तरीही जमीन मिळाली नाही त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले असे लक्षात आले आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वामी स्वाभिमानी योजनेमध्ये त्यांना जमीन मिळाली होती या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून 2019 पासून पाठपुरवठा करण्यात येत आहे यासाठी जाधव यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन दिली परंतु अद्यापही त्यांना जमिनीचा ताबा मिळालेला नाही कौशल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते यांना गट नंबर 4001 मधील प्रत्येकी एक हेक्टर 35 आर जमीन मिळाली होती. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे याकडे प्रशासनाचे लक्ष देण्याची मागणी होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच असतात असे मुख्यमंत्री सांगतात अधिवेशनातही शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार निर्णय घेत असल्याच्या घोषणा केल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते असे दुःख व्यक्त केले.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.