Prostahan Anudan Update 2023 | प्रोस्ताहन अनुदान अपडेट २०२३ :-
अमलबाजी बजावणी सुरू होईपर्यंत सरकार बदलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तातडीने पहिली यादी जाहीर केली. ते यादीमध्ये जिल्ह्यातील एक लाख 29 हजार 318 पात्र शेतकऱ्यांच्या समावेश होता. त्यातील बहुतांशजणांच्या खात्यावर पैसेही आले होते. पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी तयार झाली तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीची कामे सुरू झाली आणि उर्वरित शेतकऱ्यांची पैसे खात्यावर येणे थांबवण्यात आले. निवडणुकीनंतर ५७३१० शेतकऱ्यांची दुसरी यादी आली येता पंधरा दिवसात तिसरी यादी येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 5000 शेतकऱ्यांचा समावेश असेल. विकास संस्थांकडे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत अधिक असली तरी राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जदार खातेदारही कमी नाहीत. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारकडे दाद मागता येईल. तिन्ही यादी ज्यांची नावे आलेली नाहीत त्या अपात्र शेतकऱ्यांना शासनाकडे दाद मागता येणार आहे. संबंधितांच्या अर्जावर शहानिशा होऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.