Big Decisions Regarding 10th And 12th Exam | 10 वी आणि १२ वी परीक्षेबाबत मोठे निर्णय |

Big Decisions Regarding 10th And 12th Exam | 10 वी आणि १२ वी परीक्षेबाबत मोठे निर्णय |

नमस्कार मित्रांनो, शेतकरी आई मराठी मध्ये तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे परीक्षा मंडळाबाबत मंडळाकडून काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत चला तर आपण पाहूया नेमक्या काय आहेत त्या सूचना 10 वी व 12 वी परीक्षेबाबत मंडळांकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रात उपस्थित रहावे लागणार आहे. मात्र आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. कारण आता विद्यार्थी उशिरा पोहोचण्याच्या पद्धतीचा गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाचे निदर्शनात आले आहे. या कारणाने बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यावर्षी 21 फेब्रुवारी ते 25 मार्च यादरम्यान घेण्यात येणार आहेत. व तसेच आपण सर्वांना माहिती आहे की, पेपरची वेळ सकाळच्या सत्रात 11वाजता तर दुपारी 3 वाजता अशी  ही पेपरची वेळ राहत होते. मात्र आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला तरी, विद्यार्थीला पेपर देण्याची परवानगी मिळत होती. परंतु राज्य मंडळांनी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश नाकारण्याचे आदेश परीक्षा केंद्रांना दिले आहेत. विद्यार्थी आता परीक्षेसाठी सकाळी 10:30 तर दुपारी 2:30 वाजता या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. व तसेच या संदर्भात परीक्षा मंडळांनी देखील सर्व शाळांना पत्रे पाठवले आहेत. विद्यार्थी उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये प्रश्नपत्रिका येतील असे असल्याची निदर्शनात आले आहे. याबाबत मंडळाने दखल घेऊन कारवाई केली परंतु, या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाने एक पत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळत हजर राहणे हे अत्यावश्यक आहे. परीक्षा मंडळांनी गैर प्रकारावर प्रतिबंध घालण्यासाठी बोर्डाने परिपत्रक जारी करून हे महत्त्वाचे पाऊल उचलला आहे. यापुढे परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश देता येणार नसल्याचे मंडळांनी सांगितले आहे.

See also  UPSC Exam 2023 l  यूपीएससी परीक्षा वेळखाऊ झाल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे, संसदीय समितीचा इशारा.

चला तर पाहूया यावर्षी होणारे बदल:

आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या एक-दोन वर्षी पासून करोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी परीक्षेत काही प्रकारचे बदल करण्यात आले आहे. करोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत या वार्षिक पासून बंद करण्यात आली आहे. सोबतच दहावी आणि बारावी परीक्षेत बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या:

  • औरंगाबाद विभागात दहावीसाठी एकूण १,८०,२१०विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील-६४,५९३
  • बीड-४१,५२१
  • परभणी-२७,८००
  • जालना-३०,६७६
  • हिंगोली या जिल्ह्यात-१५,६२०
  • इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

बारावी या वर्गातील

  • औरंगाबाद जिल्ह्यातील-७,४००
  • बीड-३८,९२९
  • परभणी-२४,३६६
  • जालना-३१,१२७
  •  हिंगोली जिल्ह्यातील-१३,४४१

विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment