Railway requirement 2023 | दहावी पास वर मिळणार रेल्वेत नोकरी.

Railway requirement 2023 | दहावी पास वर मिळणार रेल्वेत नोकरी.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  तुम्हाला सांगण्यात आनंद होतो की,  जर तुम्ही दहावी पास असेल आणि तरी तुम्हाला जॉब नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.  दहावी पास असलेल्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी करण्याची संधी प्राप्त होत असून,  त्या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अनुभव अर्जाची शेवटची तारीख याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया.  भारतीय रेल्वे भरती बोर्डने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.  या भरतीद्वारे एकूण 2,026 पदे भरली जाणार आहेत.  दहावी-बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.  10 जानेवारी 2023 पासून याची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

रेल्वे भरती करिता शैक्षणिक पात्रता.

शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणताही मान्यता प्राप्त संस्थेतून किमान 50% गुणासह दहावी उत्तीर्ण किंवा समक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक राहणार आहे.  याशिवाय उमेदवारांकडे आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे,  ही आवश्यक राहील. अधिक तपशिलांसाठी उमेदवारांनी भरती अधिसूचना वाचणे आवश्यक राहील.

रेल्वे भरती करिता उमेदवाराकरिता वयोमर्यादा.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 24 वर्षे असणे आवश्यक आहे.  व तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

रेल्वे भरती करिता अर्ज शुल्क.

शिकाव पदांकरिता अर्ज करणाऱ्या सर्व राखीव श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून शंभर रुपये भरावे लागतील. एससी.  एसटी.  आणि महिला उमेदवारांना कोणताही शुल्क भरावा लागणार नाही.  तर जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.  आणि दहावी पास वर मिळवावी ही नोकरी.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.

 

See also  Ration Card new update Maharashtra 2023 l  रेशन कार्ड होणार बंद, पहा हे नवीन नियम आणि आपले धान्य सुरू करा. 

3 thoughts on “Railway requirement 2023 | दहावी पास वर मिळणार रेल्वेत नोकरी.”

Leave a Comment