Aadhar Card update 2023 l तुमचे आधार कार्ड करा अपडेट नाहीतर ते रद्द होईल.
डेमोग्राफिक अपडेट करिता पन्नास रुपये तर बायोमेट्रिक अपडेट साठी शंभर रुपये असा शुल्क आकारला जाणार आहे. नावातील चुका मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते. आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदी अद्यवत होणे आवश्यक आहे. यासाठी दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे त्यांना आता आपले आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. संबंधित नागरिकांना जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक राहील.