Anganwadi Sevika Recruitment अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस पदाकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती खालील प्रमाणे.
थेट नियुक्तीची प्रकरणे निकाली काढल्यानंतर रिक्त राहणाऱ्या तसेच सेवानिवृत्तीमुळे अथवा अन्य कारणांमुळे पद रिक्त झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत जाहिरात देऊन ही रिक्त पदे तसेच नवीन निर्माण पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात यावेत. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यात यावी यासाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस मदतनीस पदाकरता इयत्ता 12वी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समक्ष मधून अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील.
स्थानिक रहिवासी असणे आवश्यक
ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी, वस्ती, पाडे यासह व नागरी प्रकल्पाचे बाबतीत त्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मधील रहिवाशी व जर एखाद्या महानगरपालिकेमध्ये एकापेक्षा जास्त प्रकल्प असल्यास त्या प्रकल्पाच्या नागरिक क्षेत्रातील रहिवासी असतील त्यांना स्थानिक समजावे.
वयाबाबतची अट
अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व का जास्तीत जास्त 35 वर्षे अशी राहील. तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा जास्तीत जास्त 40 राहील परंतु वरील परिच्छेद एकच्या अ ब क आणि ड खालील तरतुदीनुसार करण्यात येणाऱ्या थेट नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
लहान कुटुंब असावे
अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदांवर थेट व सरळसेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट खालील प्रमाणे राहील.
1)लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवार जास्तीत जास्त दोन हयात अपत्य.
2) उमेदवाराला 2000 अपत्यांपेक्षा दत्तक दिलेल्या पत्त्यांसह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवा मुक्त करण्यात येईल. तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हजारात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यांसह असून देखील तिसऱ्या पथ्य झाल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात यावी.
भाषेचे ज्ञान येथे क्लिक करा
ज्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविकेची मदतनीस ची मिनी अंगणवाडी सेविक सेविकेची नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडी मध्ये 50 पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जसे की उर्दू हिंदी माडिया, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, बिल्लोरी, बंजारा इत्यादी पैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथे अंगणवाडी मध्ये सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या (लिहिता वाचता येणे) उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी तथापि अशा उमेदवाराने इयत्ता दहावी अथवा परिशिष्ट मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक रहते पैकी किमान एक अरहता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील सदर अंगणवाडी केंद्राची यादी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना कळविण्यात यावी.