Atirushtigrast Madat अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थी आणि महिला यांना मिळणार मदत.
राज्य सरकारच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त महिलांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे. कारण या महिला आणि विद्यार्थ्यांकरिता शासनाने एक नवीन जीआर पारित केला आहे. तो म्हणजे अतिवृष्टी ग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा शुल्क सूट व महिलांना मिळणार 5000 रुपये महिना पगार. जीआर मध्ये जिल्हा नुसार यादी तयार केली जाणार आहे. आणि त्या जिल्ह्यांना किती किती रुपये मिळणार आहेत हे त्या यादीमध्ये व्यवस्थितरित्या दर्शविण्यात येणार आहे. या जीआर मध्ये फक्त 325 तालुक्यांचा समावेश होता आता शासनाने नवीन जीआर पारित केलेला आहे. आणि त्यामध्ये तालुक्यांची संख्या म्हणजे जवळजवळ 24 तालुके समाविष्ट केलेले आहेत. आता 349 तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे 34 जिल्ह्यांमधील 349 तालुके या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. आहेत पूर्ण जीआर बघण्यासाठी आपल्याला Maharashtra.gov.in या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे.