BSF Recruitment : बी एस एफ भरती

BSF Recruitment : बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (BSF) व्हेटर्नरी स्टाफमधील ग्रुप-सी (गैर-राजपत्रित) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार rectt.bsf.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२३ पर्यंत आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

या BSF भरती मोहिमेत एकूण 26 कॉन्स्टेबल पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी 18 रिक्त जागा एचसी (पशुवैद्यकीय) आणि 08 कॉन्स्टेबल (कॅनेलमन) या पदासाठी आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावी.

शैक्षणिक पात्रता

एचसी (पशुवैद्यकीय) : मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पशुवैद्यकीय स्टॉक असिस्टंटमधील किमान एक वर्षाचा अभ्यासक्रम आणि उत्तीर्ण झाल्यानंतरचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.

कॉन्स्टेबल (केनेलेमन) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय फार्ममधून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

या बीएसएफ भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. SC/ST/महिला/माजी सैनिक आणि BSF उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.

संपूर्ण माहिती बघा येथे क्लिक करून

 

See also   Van Vibhag requirement 2023 | वनविभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू, ऑनलाइन करा अर्ज.

Leave a Comment