Budget Maharashtra 2023 शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना पिक विमा एक रुपयांमध्ये काढता येणार आहे. आधीच्या योजनेमध्ये निम्म्या हप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकरी विमा पोटी भरत असत. प्रीमियम भरण्याकरता राज्य सरकारने आता पुढाकार घेतलेला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातील नवीन तरतुदीनुसार शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्याच्या भार राहणार नाही.
आता राज्य सरकार विम्याचा हप्त्याचा भार उचलणार असून, त्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे राज्य सरकार 3312 कोटी रुपयांचा भार उचलणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा काढता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.