Check Ration card list online 2023 | राशनकार्ड यादीत आपले नाव पहा.
नमस्कार मित्रांनो, शिधापत्रिकेत आपले नाव ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे ? हे आज आपण पाहणार आहोत. शिधापत्रिका ही एक केंद्र शासनाने जारी केलेला महत्त्वाचा दस्तऐवज असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. हा दस्तऐवजांमध्ये प्रविष्ट केलेला माहितीच्या आधारावरच रेशन वाटप केले जाते.
ही एक शासकीय योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील रेशन कार्डमध्ये आपले नाव समाविष्ट करू शकता व दिलेल्या माहितीचा वापर करू शकता. हे कायदेशीर मान्यता प्राप्त दस्तऐवज ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून देखील वापरले जाऊ शकते. कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट असतात. तसेच कुटुंब वाढत असताना, आपण नवीन सदस्यांची नाव देखील या कार्डमध्ये समाविष्ट करू शकतो. उदाहरणार्थ लग्न झाल्यानंतर कुटुंबात नवीन सदस्य येतो किंवा घरात जन्माला आलेले मुल असो किंवा दत्तक घेतलेले मुल त्याचे नाव रेशन कार्डमध्ये नोंदवले जाते.
लग्नानंतर जेव्हा घरामध्ये नवीन सून येते तेव्हा, तिचे आधार कार्ड अपडेट करावे लागते. मुलीला तिच्या वडिलांच्या नावाऐवजी आपल्या पतीचे नाव आधार कार्डमध्ये नोंदवावी लागते. तसेच त्यावरील पत्ता देखील अपडेट करावा लागतो. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अन्न विभागाच्या अधिकाऱ्याकडे अर्ज पाठवावा लागतो. व नवीन आधार कार्ड च्या प्रतीसह लग्नानंतर जेव्हा सून घरी येते, तेव्हा आधार रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करता येते.
शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव ऑनलाईन कसे नोंदणी करायचे ?
तुम्ही शिधापत्रिकेमध्ये नवीन सदस्याचे नाव ऑनलाईन पद्धतीने समाविष्ट करू शकता. हे करण्यासाठी आपल्याला आपल्या राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यानंतर येथे नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करणे या व्यतिरिक्त इतर अनेक पर्याय सुद्धा आपल्याला दिसतील. परंतु हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, राज्य देखील आपल्याला ही सेवा ऑनलाइन प्रदान करते.
शिधापत्रिकेमध्ये मुलाचे नाव कसे समाविष्ट करावे ?
शिधापत्रिकेमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. जर तुमच्या घरात गुल जन्माला आले असेल किंवा तुम्ही एखादी गुलदत्त घेतला असेल तर रेशन कार्ड मध्ये त्याचे नाव नोंदवण्यासाठी आधी त्यांचे आधार कार्ड बनवावे लागेल. आधार कार्ड बनवल्याशिवाय तुम्ही त्याचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकत नाही. त्याचवेळी आधार कार्ड बदलण्यासाठी तुम्हाला मुलाचा जन्माच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. आपण सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केल्यानंतर रेशन कार्डमध्ये आपल्या मुलाचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकता.
रेशन कार्ड यादीमध्ये आपले नाव कशी तपासायचे ?
रेशन कार्ड हे धान्य वाटपाचे एक कार्ड असून गोरगरिबांना हे धान्य लॉक डाऊन च्या काळामध्ये केंद्र सरकारने मोफत वाटप केले होते. परंतु बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड नव्हते अशा लोकांनी रेशन कार्ड तयार करण्यासाठी टाकलेले असताना त्याची यादी आता ऑनलाइन आलेली आहे. रेशन कार्डची यादी ऑनलाईन कशी तपासायची ते जाणून घेऊया.
अन्न विभागाने नवीन राशन कार्ड यादी जाहीर केली असून या यादीमध्ये पात्र ठरलेल्या नवीन अर्जदारांच्या नावे जोडण्यात आलेली आहेत. आणि आता तुमच्यापर्यंत हे नाव शिधापत्रिकेच्या यादीमध्ये नव्हते तर हे नवीन यादी नक्की तपासून घ्या. जर तुमचे नाव आधी शिधापत्रिकेच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही ही नवीन यादी सुद्धा तपासा कारण काही अपात्र लोकांना या यादी मधून काढून टाकण्यात आलेले आहे.
नवीन शिधापत्रिका यादी तपासण्याची सुविधा अन्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरून नवीन यादी तपासू शकता परंतु या यादीमधील नाव तपासण्याची ऑनलाईन प्रक्रिया बहुतांश लोकांना अजूनही माहित नाही तर इथे आम्ही तुम्हालाही माहिती सांगणार आहो. तसेच तुम्ही खालील माहितीच्या आधारे या रेशन कार्ड यादीची ऑनलाईन तपासणी करू शकता.
1) महाराष्ट्र रेशन कार्ड डाउनलोड शिधापत्रिका यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शिधापत्रिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला गुगल बॉक्स मध्ये nfsa. gov. in टाईप करून सर्च करायचे आहे.
2) शिधापत्रिका निवडणे शिधापत्रिकेची अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहण्याचा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्हाला शिधापत्रिकेची यादी तपासायची आहे म्हणून मेनूमधील शिधापत्रिका पर्याय निवडा. यानंतर रेशन कार्ड डिटेल्स ऑन टेस्ट पोर्टलवर क्लिक करा.
3) तुमच्या राज्याचे नाव निवडा :
यानंतर तुम्हाला स्क्रीनवर भारतामधील सर्वच राज्याची नावे दिसतील येथे आपल्याला आपल्या राज्याचे नाव शोधावे लागेल, नंतर राज्याचे नाव मिळाल्यानंतर पुढची स्टेप खालील प्रमाणे.
4) तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा :
राज्याचे नाव निवडल्यानंतर आपल्याला आता जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे. जिल्ह्याची यादी स्क्रीनवर दिसेल, त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव शोधून घ्या व जिल्ह्याचे नाव मिळाल्यानंतर तुम्हाला जिल्ह्यामधील सर्वच शहरांची नावे आणि ग्रामीण भागाची नावे यांची यादी दिसेल तर तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर शहरी ब्लॉक निवडा आणि ग्रामीण भागामध्ये असाल तर येथे ग्रामीण ब्लॉकचे नाव निवडा.
5) आता ग्रामपंचायत तिचे नाव निवडायचे आहेत. ग्रामपंचायतीचे नाव निवडल्या नंतर त्या सर्व ग्रामपंचायतची यादी दिसेल. येथे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव शोधून घ्यायचे आहे.
6) ग्रामपंचायत विषयी नाव शोधून घेतल्यानंतर ज्या रेशन कार्ड करता आपल्याला शिधापत्रिकेची यादी पाहायची आहे. त्या शासकीय रेशन दुकानाचे नाव व रेशन कार्डचा प्रकार येथे उघडणार आहे. येथे उदाहरणार्थ पात्र कुटुंब अंत्योदय शिधापत्रिका असेल.
7) इथे तुम्ही शिधापत्रिकेची यादी तपासू शकता शिधापत्रिकेचा प्रकार निवडल्यानंतर सर्व शिधापत्रिका धारकांची यादी स्क्रीनवर असेल, शिधापत्रिका क्रमांक धारकाचे नाव, वडील / पतीचे नाव, युनिट क्रमांक इत्यादी तपशील दिले जातात. रेशन कार्ड यादी कशी तपाशीची याची माहिती आपण अगदी सोप्या शब्दांमध्ये पाहिलेली आहे. आता कोणीही या माहितीनुसार घरी बसून रेशन कार्डची यादी ऑनलाईन तपासू शकता.
शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल का झाला ?
शिधापत्रिका अंतर्गत रेशन योजनाही देशातील सर्व गरीब व गरजू लोकांसाठी राबविण्यात येत असते परंतु सध्या आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेले लोक सुद्धा या योजनेअंतर्गत नाव मिळवत आहेत. परंतु अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, सध्या आपल्या देशात 80 कोटी लोक एन एफ एस ए (NFSA) अंतर्गत रेशन योजनेचा लाभ घेत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत देशातील गरीब लोकांना रेशन हे देण्यात येत असते; परंतु आता आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेले बरेच लोक या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत आणि याच कारणामुळे जी देशांमध्ये खरोखर गरीब लोक आहेत.
ज्या लोकांना खरंच अन्नाची खूप गरज आहे अशा लोकांना रेशन योजना अंतर्गत लाभ घेता येत नाही या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यामुळे देशातील गरीब व गरजू लोकांना रेशन मिळाले पाहिजे हा उद्देश आहे. म्हणून सार्वजनिक वितरण मंत्रालयाने राशन मिळवण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन कार्ड संबंधित हे नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ जी व्यक्ती पात्र असतील अशा गरजू लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. आणि जे व्यक्ती अपात्र ठरतील अशा व्यक्तींना हा मिळणार नाही.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.