Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana 2023 l छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी.
मागील दोन वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पोर्टल हे बंद होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. या योजनेची तीन भागात विभागणी केली आहे. दीड लाखांची कर्जमाफी वन टाइम सेटलमेंट आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते. या योजनेतील एक लाख 781 शेतकऱ्यांना 2018 कोटींची कर्जमाफी वन टाइम सेटलमेंट मध्ये 9953 शेतकऱ्यांना सात कोटी प्रोत्साहन अनुदाना अंतर्गत देण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र इतर गोष्टीसाठी पैसे आहेत ? समृद्धी महामार्गाचे 1600 कोटी रुपयांची रॉयल्टी जर सरकारला माफ करता येत असेल तर शेतकऱ्यांसाठी पैसे का देता येत नाहीत ? असा प्रश्न विचारला. विरोधी पक्षनेते दावणे यांनी संपूर्ण राज्याचे शेतकऱ्यांचा आढावा घेऊन यांचे शेतकऱ्यांना देणार का अशी मागणी केली यावर सावे यांनी लवकरच हे पोर्टल सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांची यादी करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. अशी घोषणा केली या योजनेबद्दलचे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.