Compensation for Damages | नुकसान भरपाई |
या संदर्भात शासनाने घेतलेला:
- राज्यात माहे जुलै ऑगस्ट २०१९ मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा,पलूस तालुक्यांमध्ये पडझड झालेल्या घराकरिता बाधित अपवादग्रस्तांना रुपये 1001.73 लक्ष (रुपये दहा कोटी एक लक्ष 73 हजार फक्त) इतका निधी लेखाशीर्ष २२४५ ०२७१ अंतर्गत संबंधित जिल्हाधिकारी यांना विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- वरील प्रमाणे निधी बिस्म प्रणालीवर विभागीय आयुक्त पुणे यांना कार्यासन म-११ यांनी तत्काळ वितरित करावा.
- विभागीय आयुक्त पुणे यांना कळविण्यात येते की जुलै ऑगस्ट २०१९ मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस तालुक्यामध्ये पतझड झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे विहित वेळेत योग्य रीतीने न केलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या अटीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी सांगली यांना विधी वितरण करण्यात यावा.
- वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे संदर्भातील क्रमांक दोन येथे दिनांक २९/०८/२०१९ व दिनांक ११/०९/ २०१९ च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. त्या वाढू दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF)संदर्भाधिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरित करण्यात आलेल्या निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दरवाजा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकाच्या मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीतून वितरित करण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा.
- पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णय संपूर्ण रक्कम बिस्म प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गर्जेनुसार कोषागारातून रक्कम आहे करून त्यानंतर रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने विस्तारित करण्याबाबत दक्षता घ्यावी सदर निधी आवश्यक रित्या कोषागारातून आहारित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा लाभार्थ्यांना मदत वाटची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.
- स्वतः निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाची लेख निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोश गार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाची त्रैमासिक तालमीत घेण्यात यावा राज्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून रा तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या उपलब्ध निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रित रित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांचे राहील.
- वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष २२४५ नैसर्गिक आपत्तीचे निवारणासाठी सहाय्य ०२ पूर चक्रीवादळ इत्यादी ११३ घरांची दुरुस्ती पुनर्बांधणी यासाठी सहाय्य(९)/(०१) घरांची दुरुस्ती पुनर्बांधणी यासाठी सहाय्य ३१ सहाय्यक अनुदानित वेतनेत्तर २२४५०२७१ या लेखाशीर्षाखाली उपलब्ध असलेल्या तरतुदी मधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- सदर आदेश शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०२२/ प्र.क्र.४३/ अर्थ-३, दि.०४.०४.२०२२ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात विहित अटी व शर्तीची पूर्तता झाल्याची खात्री करून हा निधी वितरित करण्यात येत आहे.
९) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२३०२०७१२४८५७८५१९ अ सा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by Sanjay Audumbar Dharurkar
Dt: 2023.02.07 14:39:32+05’30
(संजय औ. धारूरकर) उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
- मा.मुख्यमंत्री यांचे प्रमुख सचिव, मंत्रालय मुंबई,
- माननीय विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानभवन, मुंबई
- विधान मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य,
- मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय मुंबई
- अप्पर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई
- विभागीय आयुक्त, पुणे
- जिल्हाधिकारी सांगली,
- महालेखपाल लेखा व अनुद्नेयता १/२, महाराष्ट्र मुंबई/नागपुर,
- महालेखापाल लेखा परीक्षा१/२, महाराष्ट्र मुंबई/नागपुर,
- संचालक लेखा, व कोशगारे, मुंबई ,
- जिल्हा कोषागार अधिकारी सांगली,
- कार्यासन अधिकारी(म-११/म-३), मदत व पुनर्वसन, प्रभाग मंत्रालय, मुंबई
- वित्त विभाग कार्यासन व्यय-९/ अर्थ-६), मंत्रालय मुंबई
- निवड नस्ती कार्यासन/म-३)