E-Challan Parivahan | ई-चलान परिवहन |
आता ड्रायव्हिंग करणाऱ्यांना आनंदाची बातमी व ती म्हणजे आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स ठेवायची गरज पडणार नाही.. बिनधास्त चालवा कार आणि बाईक आता तुमचं चलान देखील ट्राफिक पोलीस कापणार नाही. आपल्याला बऱ्याचदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कार बाईकची आवश्यकता पडते परंतु कामाच्या घाई मध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स विसरून जातो व त्यानंतर ट्राफिक पोलीस कडून आपली तपासणी होते तर त्या तपासणीमध्ये आपल्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स नसते त्यामुळे ट्रॅफिक पोलीस आपले चलन कापतो इतकेच नाही तर आपल्याजवळ गाडीचे कागदपत्रे नसतील तर चलनाची रक्कम आणखी वाढत जाते तर मित्रांनो आपल्या सोबत असे घडू नये यासाठी आम्ही एका आजची माहिती तुम्हाला देणार आहोत जे आपला चलाना पासून बचाव करेल व तसेच आपल्याला गाडीचे इतर कागदपत्रे देखील ठेवावी लागणार नाहीत कारण आता Digilocker डीजे लॉकर किंवा डिजिटल लॉकर च्या मदतीने आपण वर्चुअल डॉक्युमेंट्स सहजपणे वापर करू शकतो. व हे एक सरकारी ॲप असून आपण यावर आपल्या वाहनाची कागदपत्र सेव केला. चेकिंग दरम्यान आपल्या वाहनाचे चलन कापले जाणार नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे हे ॲप वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे. तसेच सध्या बरेच लोक या ॲपचा वापर देखील करत आहेत हे एक डिजिटल दस्तऐवज वॉलेट देखील आहे आपण येथे आपली सर्व कामाचे कागदपत्र ठेवू शकतो जसे की ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पॉलिसी डॉक्युमेंट इत्यादी ठेवू शकतो व यासाठी आपल्याला एक स्वातंत्र्य क्लाऊड स्टोरेज स्पेस देखील मिळते जो तुमच्या आधार क्रमांकाचे लिंक असतो.