Farmer Loan Scheme Waive List In Maharashtra In Marathi शेतकरी मित्रहो महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waive) प्रोत्साहन पर लाभ योजनेतील पहिल्या यादीत( Farmer Incentive Scheme ) रत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश झालेला होता . या यादी मधील १२ हजार ८८० शेतकऱ्यांना न चुकता लाभ मिळाला आहे ; ६२ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification )केलेले नसल्यामुळे पहिली यादी शंभर टक्के लाभ मिळण्यापासून वंचित राहिली . दुसरी यादी जाहीर न झाल्याने कर्जमुक्ती लाभासाठी अर्ज दाखल केलेले १० हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत .
महावितरण औरंगाबाद 90 पदाचि भर्ती ITI
शेतकरी व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेती व शेतीशी निगडित कामाकरीता कर्ज घेत असतात . वर्षा २०१५ – २०१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवाही जाहीर केली होती. राज्यातील काही भागात वेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते . यामुळे मागील काही वर्षात शेतकरी शेती निगडित कर्जाची परतफेड करू शकले नव्हते त्यामुळे , शेतकरी हा कर्जाच्या दृष्टचक्रात अडकला होता . परिणामी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या . अशा शेतकऱ्यांना 2019 पासून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली होती .