Farmers News 2023 | गहू आणि हरभऱ्याचं उत्पन्न घटणार, शेतकऱ्याला नफा होणार की तोटा.

Farmers News 2023 | गहू आणि हरभऱ्याचं उत्पन्न घटणार, शेतकऱ्याला नफा होणार की तोटा.

यंदाच्या हंगामात रब्बीची महत्त्वाची पिके असलेली गहू आणि हरभरा ही पिका शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच देणार आहे थंडीच्या दिवसात घेतली जाणारी गहू आणि हरभरा ही पिकं संकटात सापडली आहेत.  गहू आणि हरभरा या पिकासाठी थंडी महत्त्वाचे असते.  थंडी या दोन्ही पिकासाठी पोषक असते.  ढगाळ हवामानामुळे थंडीही कमी झाली असून पिकांवर रोगराई आली आहे.  आणि त्यामुळे पिकाचे फार नुकसान होत आहे.  19 शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षाची परिस्थिती पाहता आर्थिक फटका बसणार आहे.  उत्पादन घेण्यासाठीचा खर्चही वाढला आहे.  त्यामुळे यंदाच्या वर्षी गहू आणि हरबरा यांच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज वर्तवीला जात आहे.  याशिवाय रब्बीच्या काळातच द्राक्ष, कांदा या पिकांना देखील फटका बसत आहे.  ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर या पिकावर औषध फवारणी करण्याच्या अधिका अधिक खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.  यामुळे शेतकरी नाराज आणि हतबल आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, टोमॅटो, कांदा या पिकांचे नुकसान तर झालेच होते. आणि आता गहू आणि हरभऱ्याचे सुद्धा काही खरं दिसत नाही आहे.  रब्बीचा पीक तरी उधार देईल अशी शक्यता असताना ढगाळ वातावरणाचे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.