Farmer’s news in Marathi 2023 l क्विंटल मागे तीनशे रुपये अनुदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व जिव्हाळ्याचा भाग आहे.
समितीची दोनशे रुपये प्रमाणे शिफारस होती. मात्र ती आता तीनशे रुपये झाले आहे.
उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 200 आणि 300 रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना उत्पादक शेतकऱ्यांची दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिक्विंटल तीनशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि घोषित केले आहे.
छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे की क्विंटल मागे पाचशे रुपये द्या.
कांदा उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना एकरी बाराशे रुपये उत्पादन खर्च येतो प्रत्यक्षात 400 500 रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडतात निदान क्विंटल मागे पाचशे रुपये तरी अनुदान द्या अशी मागणी जेष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी केली त्यावर तुम्ही शेतकऱ्यांना गाजर दाखवले आम्ही गाजर हलवा देतोय असे मुख्यमंत्री म्हणाले संतविरोधकांनी सभा त्याग केला.