समजा शेतीचे काम करताना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून शासनाकडून दोन लाखापर्यंत मदत केली जाईल , तसेच शेती काम करताना शेतकऱ्याचा अपघात होऊन एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखाची शासनाकडून मदत केली जाईल. राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी ही योजना चालू केली होती. या योजनेत देण्याचा हप्ता शासन भरत असल्याने शेतकऱ्याला विमा भरावा लागत नाहीत. तर हमखास ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाची आहे आणि फायद्याची पण आहे . Gopinath Munde shetkari Apghat Vima Yojna शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो . सद्य स्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत .