Government Decision For Farmers | शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय |
तिसरी यादी केव्हा जाहीर होणार : गेल्या काही तीन चार महिन्यापासून प्रोत्साहन अनुदानाची ही प्रक्रिया राबवली जात आहे. पहिले यादीत 48 हजार दुसऱ्या यादीत 83 हजार शेतकऱ्यांची नावे आपल्याला दिसून आली आहेत. मात्र तरीसुद्धा 53 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा आहे या दरम्यान तिसऱ्या यादीत या शेतकऱ्यांचा नाव येण्याची प्रतीक्षा असली, तरी तिसरी यादी कधी जाहीर होईल असा सर्व शेतकरी वर्गाला प्रश्न पडला असून लाभार्थ्यामधून देखील विचारला जात आहे.
तहसील स्तरावर 138 तक्रारी दाखल करण्यात आल्या : शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाबाबत मिळणारी रक्कम मंजूर नसल्यास त्याबाबत तहसीलदार या स्तरावर तक्रार करण्याची मुभा आहे व त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदार स्तरावर 138 तक्रारी आल्या असून आतापर्यंत 187 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत DLC या स्तरावर 268 तक्रारी असून 102 तक्रारी सोडवण्यात आले असल्याचे उपाय निबंधक कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने दिले शेतकऱ्यांना आवाहन : शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यात एक लाख 84 हजार 556 पात्र लाभार्थी आहेत. यामधून एक लाख 31 हजार 444 जणांना शासनाकडून विशिष्ट क्रमांक मिळाला असून 1 लाख 25 हजार 591 जणांची केवायसी झालेली असून 5 लाख 653 शेतकऱ्यांची आतापर्यंत केवायसी केलेली नसल्यामुळे 50 लाख 653 शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी केले आहे.