Govt Decision for Teachers 2023 | शासनाचा शिक्षकांसाठीचा निर्णय 2023.
शासन निर्णय
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रथम नियुक्ती पासून पहिल्या तीन वर्षासाठी खालील प्रमाणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र. पदनाम मानधन (रुपये)
1. ग्रांथपाल 14,000/-
2. प्रयोगशाळा सहायक 12,000/-
3. कनिष्ट्ठ नलनपक 10,000/-
4. चतुथम श्रेणी कर्मचारी
(के वळ अनुकां पा तत्वावर
नियुक्त)
8,000/-
शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 11 12 2020 नुसार चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यापगत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थ श्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. तथापि अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्तावरील मानधन लागू होणार आहे. तसेच जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी दिनांक 11/ 12/ 2020 पूर्वी चतुर्थ श्रेणी सर्वांगात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षाचा कालावधी संपुष्टात आलेला नाही. त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील.