Gram Suraksha Scheme Details | ग्राम सुरक्षा योजना तपशील |
गुंतवणूकदार हा पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मासिक त्रे मासिक सहामाही किंवा वार्षिक अशा प्रकारे पैसे जमा करू शकतात गुंतवणूकदारांना प्रीमियम पेमेंट करण्यासाठी 30 दिवसाच्या वाढीव कालावधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व तसेच यामध्ये गुंतवणूकदारांना कर्ज घेण्याची सुविधा देखील मिळाली आहे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना तीन वर्षांनी पॉलिसी सिलेंडर करता येते योजना सिलेंडर केल्यास गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळणार नाही.
प्रति दिवस 50 रुपये गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये
मित्रांनो जर तुमचे वय 19 वर्षे असून तुम्ही किमान दहा लाख रुपयांच्या योजनेमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली तर 55 वर्षी तुमची एकूण रक्कम 31.60 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला प्रति महिना 1515 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल इतके पैसे जमा केल्यानंतर वयाच्या 58 व्या वर्षी 33.40 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला 1463 रुपये मासिक रक्कम जमा करावे लागेल तर तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षी 34.60 लाख रुपये मिळण्यासाठी तुम्हाला 1411 रुपये रक्कम जमा करावे लागेल तर मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.