Grampanchayat Job Card 2023 | ग्रामपंचायत जॉब कार्ड 2023.
सगळ्यात आधी आपल्याला मनरेगाच्या वेबसाईटवर जावं लागेल. http://nrega.nic.in ही वेबसाईट गुगलमध्ये आपल्याला सर्च करावी लागेल. वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. त्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे. जनरेट रिपोर्ट्स यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये विविध राज्यांची नावे आहेत, त्यामधून महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे. फायनान्शिअल इयर निवडायचा आहे. डिस्ट्रिक निवडायचा आहे. ब्लॉक निवडायचा आहे. आणि त्यानंतर ग्रामपंचायत समिती निवडायचे आहे. सर्वात शेवटी आपल्याला प्रोसिड वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर गावाचा डॅश बोर्ड उघडे R5 IPPE ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे, लिस्ट ऑफ वर्क यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बरेच ऑप्शन दिसतील. त्या कामांपैकी जे काम आपल्याला पाहायचं असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल, जसे की ग्रामीण पाणीपुरवठा फिशरीज आहे, इंदिरा आवास घरकुल योजना असेल सर्व ऑप्शन आपल्याला तिथे पाहायला मिळतात. त्यापैकी आपल्याला जे हवे असेल त्यावर क्लिक केल्यानंतर त्या कामाची योजना आणि त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिसेल. वैयक्तिक लाभाच्या योजना जसं की, सुलभ शौचालय ऑल सिलेक्ट केल्यानंतर त्या योजनेचे लाभार्थी ती योजना चालू आहे किंवा बंद आहे ? योजना कंप्लिट झालेली आहे किंवा नाही ? समजा नवीन काम असतील तर ऑल सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जे वर्ष निवडायचे असेल. ते निवडता येते, वर्ष निवडल्यानंतर कामाचे नाव त्या कामाचा स्टेटस काय आहे. वर्ष कामाची कॅटेगिरी काय ? आहे हे सर्व तुम्हाला तिथे बघता येईल. म्हणजेच त्या वर्षातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुम्हाला पाहता येते. हे पाहत असताना आपण ज्या जॉब कार्ड वरती ज्या लोकांना काम दिले गेले त्यांची माहिती सुद्धा व पाहू शकता.