How to Draw Digital 7/12 | डिजिटल 7/12 कसे काढायचे |

How to Draw Digital 7/12 | डिजिटल 7/12 कसे काढायचे |

  • सर्वप्रथम तुम्हाला google वर जाऊन डिजिटल सातबारा उतारा काढण्याकरिता त्याची ऑफिशियल साईट टाकावी लागेल.
  •  त्यानंतर तुमच्यासमोर पहिले पेज उघडेल व त्या पेज वरती महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाचे मुख्य पान उघडेल.
  • ते साईट उघडल्यानंतर तुम्हाला त्या पानाच्या उजवीकडे डिजिटल साईन सातबारा किंवा डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा पाहायचा असल्यास येथे क्लिक करा असा पर्याय उपलब्ध होईल.
  • तिथे दिलेला ऑप्शन्स वरती क्लिक करायचे व क्लिक केल्यानंतर तेथे सातबारा नावाचा एक पेज तुमच्यासमोर उघडेल.
  • तुम्ही याआधी या वेबसाईट वरती नोंदणी केली असेल तर लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही साइटवर त्या सेवेचा लाभ घेऊ शकता.
  • मात्र तुम्ही त्या साइटवर पहिल्यांदाच आले असाल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल व ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक सातबारा काढता येईल व त्यानंतर तेथे तुम्हाला ओटीपी बेसिस लॉगिन हा पर्याय उपलब्ध होईल.
  • तुम्हाला सेंटर मोबाईल क्रमांक च्या खाली तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड होईल व तुम्हाला ओटीपी सेंड होण्याचा मेसेज येईल तो म्हणजे ओटीपी सेंट ऑन युवर मोबाईल असा असेल.
  • तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ओटीपी म्हणजे काय असतो आता बऱ्याच लोकांना माहिती पण असेल परंतु काही लोकांना माहिती नसतो तर यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ओटीपी म्हणजे One time password असा असतो.
  • आता तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी हा ओटीपी च्या रकान्यामध्ये टाकायचा.
  • आता मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तिथं व्हेरिफाय ओटीपी असे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  •  सर्व हे सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्यासमोर सातबारा नावाचा एक पान उघडेल या पानावर डिजिटल साईन सातबारा डिजिटल साईन ८ डिजिटल सायन्स प्रॉपर्टी कार्ड रिचार्ज अकाउंट पेमेंट स्टेटस असे पर्याय तिथे उपलब्ध होतील यामधून डिजिटल सातबारा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल स्वाक्षरी सातबारा अशा प्रकारचे हेडिंग असलेले पान ओपन होईल व यामध्ये सर्वात शेवटी अशी सूचना देखील येईल की 15 Rupees Will Be Charged For Download For Every Satbara This Account Will Be Detected From Available याचा अर्थ असा होतो की सातबारा करता 15 रुपये तुमच्या अकाउंट मधून चार्ज केले जातील त्यामुळे महाभुलेख या अकाउंट मध्ये तुमच्या खात्यात पैसे असणे गरजेचे आहे.
  • आता यानंतर रिचार्ज कसे करायचे तर त्यामध्ये तुम्हाला रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर पंधरा रुपये डेबिट किंवा क्रेडिट असेल किंवा इंटरनेट बँकिंग असेल याद्वारे जमा करता येऊ शकतात व तसेच तुमच्या करता तेथे वेगवेगळे पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
  • आता यानंतर परत तुम्हाला डिजिटल सातबारा चा फॉर्म वर जावे लागेल तेथे तुम्हाला पंधरा रुपये क्रेडिट असे दिसेल.
  • ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव गावाचे नाव निवडायचे आहे त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकावा लागेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन ला क्लिक करायचा आहे त्यानंतर डाउनलोड झालेला सातबारा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पाहता येईल व या सातबारावर स्पष्ट लिहिलेलं असतं की हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केलेला असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची सही किंवा शिक्के ची गरज भासणार नाही.
अधिकृत Website वर जाण्यासाठी येथे Click करा.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा आपल्या मोबाईलवर घरबसल्या काढू शकता व यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही फक्त पंधरा रुपयांमध्ये आपल्याला आपला सातबारा काढता येईल तुम्हाला जर ही बातमी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअर देखील करू शकता.

 येथे Click करा होम लोन.