Lek Ladki Yojana Maharashtra 2023 l लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023.
राज्याचे मुख्यमंत्री व तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्ष साठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली राज्य शासनाच्या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्ड कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यामध्ये मुलींना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर ठराविक रक्कम दिली जाणार आहे.
मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर तिच्या नावावर 5000 हजार रुपये जमा केले जाते. त्यानंतर चौथीत असताना 4000 रुपये, सहावीत असताना सहा हजार रुपये आणि मुली अकरावी गेल्यानंतर त्याच्या खात्यात आठ हजार रुपये जमा केल्या जातील. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर फिरा 75 हजार रुपये रोख मिळते असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा पालन पोषणाचा आणि इतर खर्च करणे सोपे होणार आहे. अल्प उत्पन्न गटातील मुलींनी शिकावे स्वतःच्या गाव उभे रहावे यासाठी योजना फायदेशीर ठरणार आहे.