List of Gram Panchayats | ग्रामपंचायत यादी |
मित्रांनो त्यामधली आपल्याला दोन नंबरचे टॅब निवडायचे आहे. त्या टॅब वरती Approve Action Plan Report असे लिहिलेले राहील त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ॲक्शन प्लॅन म्हणजे ग्रामपंचायत मध्ये जो निधी प्राप्त झालेला आहे. तो निधी ग्रामपंचायत या योजनेवर आणि कोणत्या बाबीवर खर्च करणार आहे याविषयी माहिती आपल्याला तिथून मिळू शकते प्लॅन आराखडा हा पंचायत समिती पंचायत समिती सादर करायचा असतो व अशा आराखड्याच्या वेळी पंचायत समिती मंजुरी देते त्यावेळेस ग्रामपंचायतला असे विकास कामे आणि विविध बाबीवर खर्च करता येत असतो तर त्याच विकास कामाची किंवा ॲक्शन प्लॅन ची माहिती आपल्याला या ठिकाणावर दिसेल तर मित्रांनो ऍक्शन प्लॅन वर क्लिक करायचे आहे ॲक्शन प्लॅन वरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारे पेज ओपन झालेल्या दिसेल आता आपल्याला सिलेक्ट प्लॅन टाकावा लागेल व त्यामध्ये आपल्याला हवी असलेल्या गोष्टीची निवड करायची आहे व तसेच कोणत्या वर्षाचे माहिती आवश्यक आहे ते सुद्धा तुम्हाला टाकावा लागेल आपल्याला जर चालू वर्षाची माहिती हवी असेल तर आपण 2022/23 या ऑप्शन वर क्लिक करू शकतो. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॅपच्या कोड दिसेल तो भरायचा आहे. जसेच्या तसे प्लॅन इयर आणि त्याच्या कोड व्यवस्थित टाकल्यानंतर गेट रिपोर्ट या टॅब वर क्लिक करायचे आहे. Get Reporter tabवर क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारची पेज ओपन झालेले दिसेल.
मित्रांनो आपल्याला या पेजवर ती आपल्या राज्याची निवड करायची आहे. यामध्ये सर्व राज्य आपल्याला तिथे दिसतील तर तुम्ही कोणत्या राज्याचे आहात त्या राज्याची निवड तुम्हाला करावे लागणार आहेत महाराष्ट्र राज्यात राहत असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्य करू शकता व हे राज्य 20 क्रमांकावर राहील आणि जी निळ्या रंगांमध्ये अंक आहेत त्या अंगावर आपल्याला क्लिक करायचे आहेत तर मित्रांनो या अंकावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निवड केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी तेथे दिसणार आहे. तर आपल्याला ज्या जिल्ह्याची माहिती हवी आहे त्यावर क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे व त्या तालुक्यांमध्ये आपले गाव निवडायचे आहे आपण ज्या राज्यात राहत असाल त्या राज्याच्या समोर निळ्या अक्षरात तीन नंबर दिलेल्या राहत्या या नंबर वर क्लिक करायचे आहे आपण त्या तीन अंकावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर राज्याची व जिल्ह्याचे सविस्तर यादी तेथे पाहायला मिळेल यामध्ये आपले जे गाव असेल त्यावरती क्लिक करा व त्यानंतर आपल्यासमोर त्या गावाची संपूर्ण माहिती दिसून येईल ग्रामपंचायत मधील आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे.