LPG Gas Price 2023 | घरगुती गॅस लवकरच स्वस्त होणार पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली गुड न्यूज.

 LPG Gas Price 2023 | घरगुती गॅस लवकरच स्वस्त होणार पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली गुड न्यूज.

अगदी नगण्य तीन चार रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या खात्यावर जमा होत आहे.  ही थट्टा थांबविण्याची विनंती सातत्याने करण्यात येत आहे.  तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीही कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.  केंद्र सरकार सध्या जवळपास 60% गॅसची आयात करते.  केंद्रीय मंत्री हर्दीपसिंह पुरी यांना यांनी सध्या दोनशे रुपये सबसिडी देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत तरी केंद्र सरकार भारतातील ग्राहकांप्रती संवेदनशील असल्याचा दावा पुरी यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढलेल्या असूनही त्यांची झळ भारतीय ग्राहकांना बसू दिली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सौदी करार दरात 33% वृद्धी झाली असून भारतीय बाजारात त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  कोविड महामारीच्या काळात केंद्र सरकारने गरीब जनतेला मोठा दिलासा दिला.  त्यांनी तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिलेल्या देण्यात आले.  2014 मध्ये देशात 14 कोटी घरगुती गॅस कनेक्शन होते.  त्यानंतर आता देशातील 31 कोटी जनतेकडे गॅस जोडणी असल्याचे ते म्हणाले.  ते विपणन कंपन्यांना 28 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.