LPG gas subsidy Yojana l एलपीजी गॅस सिलेंडर वर मिळणार एवढ्या रुपयांची सबसिडी, येथे पहा संपूर्ण माहिती.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे 2023 ते 24 या वर्षात सात हजार 680 कोटी रुपये लागतील. आणि ही सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ही सबसिडी फक्त उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जात असल्याचं सरकारने यापूर्वीसुद्धा स्पष्ट केलेला आहे. 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी घेतलेला आहे. या सबसिडीची लाभ मिळवण्यासाठी तुमचा आधार नंबर गॅस कनेक्शन सोबत लिंक असणे गरजेचे राहिल. या योजनेच्या माध्यमातून जे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील आहे अशांना सरकार मोफत गॅस कनेक्शन देणार आहे.