Maharashtra Sarakarchi Salokha Yojana 2023| महाराष्ट्र सरकारची सलोखा योजना २०२३
Maharashtra Sarakarchi Salokha Yojana 2023| महाराष्ट्र सरकारची सलोखा योजना २०२३ :-
शेतजमिनीचा ताबा असो किंवा वहिवाट बाबत शेतकऱ्यांमध्ये वाद असो हे वाद वाढविण्यापेक्षा कमी कसे केले जातील याचा विचार महाराष्ट्र सरकारने केला आहे. त्याकरिताही सलोखा योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या योजनेबाबत सरकारचे वाटले की एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर असेल आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा शेत जमिनीवरील ताबा पहिल्या शेतकऱ्याच्या नावावर असेल तर अशा शेत जमीनधारकांना अदलाबदल दस्तान साठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क मध्ये सवलत देणार आहे. तर जास्त नोंदणीच्या फेरबदलनीसाठी मुद्रांक शुल्क 1000 रुपये आणि नोंदणी फी 100 रुपये असणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होऊन न्यायालयातील प्रकरण निकाली लागतील या योजनेमुळे मनातील द्वेष राग नाहीसा होईल. महाराष्ट्रातील एकूण जमीन धारकांची खाते संख्या तीन कोटी 37 लाख 88 हजार 253 एवढी आहे एकूण वहिवाटदार शेतकरी एक कोटी 52 लाख इतके आहेत. 13 लाख होने अधिक शेत जमिनीच्या ताब्यात तंटे आहेत हे तंटे सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. सलोखा योजनेत अर्ज केल्यानंतर तलाठी मंडळ आणि मंडळ अधिकारी यांनी पंधरा दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे असे या योजनेत नमूद केलेलं आहे.