पण दुष्काळाच्या परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता . त्यामुळे शासनाने 50 हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी कर्जमुक्ती योजना शेतकरी बांधवांसाठी 2019 मध्ये लागू केली होती . प्रोत्साहन लाभ योजनेची यादी जाहीर होऊन महिना झाला तरीही शासनाने दुसरी यादी जाहीर केलेली नाही . योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील २३ हजार ५९० शेतकऱ्यांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. यातीलच १२ हजार ९४२ शेतकरी बांधवांचा पहिल्या यादीत समावेश आहे . तरीही मात्र दहा हजार 748 शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली नाहीत . मात्र दुसऱ्या यादीत यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शासनाने पहिली यादी जाहीर केली असून यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश यादीमध्ये होता. नऊ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली होती . तरीही नोहेंबर महिन्यापर्यंत १२ हजार ८८० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे. या योजनेअंतर्गत एकूण 31 कोटी 83 लाख रुपये एवढी रक्कम जमा झालेली आहे . मात्र उर्वरित राहिलेल्या 62 शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही म्हणून उर्वरित राहिलेले शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.