Mhada Home Lottery 2023 | म्हाडा घरांच्या लॉटरीमध्ये पहा कुठे किती घरांचा समावेश आहे.
माढा कंपनी नेहमी घरांसाठी लॉटरी काढत आहे. आता पुन्हा सिडको आणि म्हाडाने ही नवीन योजना आणली आहे. यामध्ये तुमच्या घराचे स्वप्न 14 ते 17 लाखांमध्ये पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला घर घ्यायचे असेल तर ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. म्हाडा लॉटरी कोकण मंडळातील 4752 म्हाडा घरांचे वाटप 11 एप्रिल 2023 रोजी केला जाणार आहे. यासाठी 20 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू होतील. विविध ठिकाणी म्हाडा घरांसाठी लॉटरी निघालेली आहे. या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता तुम्हाला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.