Mobile Update | मोबाईल अपडेट |
नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनाच माहिती आहे की धावपळीच्या युगामध्ये सध्या फोनही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट बनलेली आहे. आपण अगदी छोट्या कामापासून ते मोठ्या कामापर्यंत मोबाईलचा वापर करत असतो. तसेच घरातील कामे असो किंवा ऑफिस मधील कामे ते आपण मोबाईलवरच करून राहिलो. धावपळीच्या युगामध्ये आणि मोबाईलचा सतत वापर केल्यामुळे फोनची बॅटरी संपते किंवा बऱ्याच वेळी फोन पूर्ण चार्ज करण्यासाठी आपल्याजवळ वेट नसतो. अशावेळी तुमच्या फोनची बॅटरी टिकवायचे असेल तरी काही साधे सोपे उपाय तुम्ही केले आहेत का तर पहा मित्रांनो मोबाईलचे बॅटरी जर जास्त काळ टिकवायचे असेल तर तुम्हाला या काही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की मोबाईल मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी असते बॅटरी संपली की मोबाईल हा काहीच कामाचा राहत नाही सध्याच्या नव्या मोबाईल मध्ये आता लिथियम आयन बॅटरी चा वापर केल्याने आधीच्या मोबाईलच्या तुलनेत ती जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. मात्र काही गोष्टीची काळजी घेतली तर मोबाईल बॅटरीची लाईफ आणखी वाढून उत्तम चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकते. चला तर पाहूया काय करावे लागेल.
-
सॉफ्टवेअर अपडेट करा
- सर्वात आधी मोबाईल मधील सॉफ्टवेअर अपडेट करा. त्यानंतर मोबाईल मधील सॉफ्टवेअर हे नेहमी अपडेट ठेवावे. मोबाईलची Adaptive ब्राईटनेस आणि Adaptive बॅटरीचे फीचर्स ते तुमच्या मोबाईल मध्ये सुरू ठेवावे.
- ब्राईटनेसमुळे मोबाईल ऑटोमॅटिकली आपल्याला हवा तसा प्रकाश अड्जस्ट करतो व त्यामुळे आपल्या बॅटरीचा जास्त प्रमाणात वापर होत नाही.
- मोबाईल मधील रनिंग ॲप्स क्लिअर करा.
- मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की मोबाईल मध्ये आपण एकच ॲप वापरत नाही. तर भरपूर अशा ॲप आहे जे आपण डेली युज करतो.
- काम झाल्यानंतर ते ॲप क्लोज न करता लगेच दुसऱ्या App वरती जातो तर मित्रांनो मोबाईल मध्ये आपलं काम झाल्यानंतर रनिंग अप्लिकेशन क्लिअर करा.
- बॅकग्राऊंडला जे अप्लिकेशन आपण सुरू ठेवले आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलच्या मेमरीवर जास्त भार येतो. आणि बॅटरी जास्त वापरले जातात.