Muktainagar Yethil Mahila Banali Youtyub Star | मुक्ताईनगर येथील महिला बनली युट्युब स्टार :-
जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या मुक्ताईनगर येथील तालुक्यात राहणाऱ्या मनीषा वंजारी या शेतकरी महिलेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मनीषा वंजारी या मुक्ताईनगर तालुक्यातील इच्छापुर येथे एका खेड्या गावात राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या घरी शेती असल्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. रोज शेतात जाणे शेतातील कामे करणे दिवसभर शेतात राबराब राबणे आणि त्यानंतर घरी आल्यावर घरचे काम करणे असं त्यांचं दैनंदिन जीवन, पण आज त्या युट्युब स्टार बनलेल्या आहेत. आता सगळ्यांना वाटत असेल की ,हे कसं शक्य आहे पण हे खरं आहे चला तर मग जाणवे यांचा प्रवास कसा सुरू झाला. मनीषा वंजारी यांना 24 वर्षाचा एक लहान भाऊ ज्याचे नाव ओम सावळे असे आहे याला युट्युब वर व्हिडिओ बनवण्याची खूप आवड होती त्यामुळे यांनी यात मध्ये रुची घेतली व लोकांना त्यांचे व्हिडिओ आवडायला लागते आणि तो काही दिवसातच फेमस झाला. त्यानंतर त्याने या या व्हिडिओ बद्दलची व youtube बद्दलची संकल्पना आपल्या बहिणीला म्हणजेच मनीषा वंजारी यांना दिली त्यानंतर मनीषा वंजारी यांना दहा वर्षाची मुलगी तिच्या नावाने त्यांनी एक अकाउंट यूट्यूबला अकाउंट उघडले तेव्हा मुलीच्या व्हिडिओ व्हिडिओ बनविताना व्हिडिओमध्ये कधीकधी मनीषा वंजारी याही दिसायच्या आणि तेही व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि नंतर लगेच त्या युट्युब स्टार बनल्या त्यात अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की युट्युब वर त्यांचे 37 हजार पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहे मनीषा वंजारी म्हणाल्या आम्ही शेतकरी माणसं निसर्गावर आमचा उदरनिर्वाह होणारे त्यामुळे आमच्या घरात कधी पिके तर कधी येता ही नाही त्यामुळे मीही युट्युब वरून महिन्याला पण वीस ते पंचवीस हजार सहज कमावते त्यापुढे म्हणतात की मला आवड होती म्हणून मी व्हिडिओ बनवायची पण त्यापासून मी कमवायला लागले हे माझ्यासाठी खूप आनंदी आणि फायद्याचे ठरले असे नाही की मी youtube स्टार बनले किंवा मी 20 ते 25 हजार कामगार महिन्याचे कमवायला लागले तर मी शेतात जाणे सोडले असे काहीच नाही आहे आम्ही शेतकरी माणसं आम्हाला शेतीत जाणे हेच योग्य वाटते आणि यातच आम्हाला आनंदही मिळतो पुढे त्या म्हणतात की एखादी शेतकरी महिला किंवा खेड्यात राहणारी किंवा घरगुती काम करणारी महिला जेव्हा युट्युब ला व्हिडिओ बनवते किंवा काहीतरी नवीन करायला किंवा शिकायला लागते तेव्हा लोक नाव बोटे ठेवतातच आणि खेड्यातली खेड्यातील लोक तर ठेवताच ठेवतात असे माझ्यासोबतही झाले पण मी लोकांकडे कधी लक्ष दिले नाही मी माझे कर्तव्य करत राहिल आणि करतच राहणार शेतीचा कधी उत्पन्न मिळतं तर कधी मिळतही नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवून स्वतः कमवू शकता असेही मनीषा म्हणाले मनीषा यांनी बदलत्या जीवनशैलीनुसार स्वतःला बदलले तसे तुम्हीही स्वतःला बदलून काहीतरी नवीन करू शकता आणि त्यांनी आपला शेती व्यवसाय किती छान प्रकारे जपलेला आहे ही शेतकरी महिलांसाठी अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी गोष्ट ठरत आहे.