Onion rates in Maharashtra market l कांदा उत्पादकांना सरकारकडून प्रती 350 रुपये क्विंटल अनुदान जाहीर.
सरकारने फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त २०० क्विंटर प्रति शेतकरी अनुदान मंजूर केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी लाल कांदा 1 फेब्रुवारी ते 31 मार्च कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती खासगी बाजार समिती आणि नाफेडकडे विक्री केली असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे.
योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हे अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्री पट्टी विक्री पावती सातबारा उतारा बँक खाते बचत खाते क्रमांक इत्यादी साध्या कागदावरच्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली जाते तिथे अर्ज करावा असे आवाहन सरकारकडून शेतकऱ्यांकरिता करण्यात आले आहे.