Pik Vima Yojana 2022 | पीक विमा योजना 2022 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, दहा हजार ग्राम पंचायत मध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार शासनाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा मोठा निर्णय शासनाने आणि कृषिमंत्री यांनी घेतला आहे . तापमान वाऱ्याची दिशा आणि वेग सापेक्ष आद्रता पर्जन्यमान यांची माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील काही ठिकाणांवर स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा शासनाचा निर्णय आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 10,000 ग्रामपंचायत मध्ये ही केंद्र उभारणार उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी माहिती दिली आहे राज्यात मंडळ स्तरावर 2119 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली या केंद्रांमधून पावसाची आकडेवारी हवामान केंद्रामध्ये महावेध प्रणाली अंतर्गत संकलित होणारी माहिती सुरक्षित राहते.