Post Office IPPB Scheme पोस्ट ऑफिस मध्ये अनेक अशा सुविधा मिळतात त्या सुविधा कोणकोणत्या मिळतात बघूया खालील प्रमाणे.
कोणत्या सुविधा मिळतात?
पोस्ट खात्याच्या या प्रीमियम सेव्हिंग अकाऊंटमध्ये, बचत खात्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतील. यामध्ये कर्ज, व्हर्चुअल डेबिट कार्ड, डोअर स्टेप बँकिंग यासारख्या सुविधा मिळतील. जर तुम्ही पोस्टा खात्यात प्रीमियम बचत खाते उघडाल तर तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल. तुम्ही घरबसल्या कर्जासाठी अर्ज करु शकता. खातेदाराला योजनेतंर्गत व्हर्च्युअल डेबिट कार्डची सुविधा मिळेल. तुम्ही या खात्यामार्फत बिल पेमेंट केले तर कॅशबॅकची सुविधा ही प्राप्त करता येईल.
डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना कोणता फायदा मिळेल?
पोस्ट ऑफिसच्या प्रीमियम बचत खाते, त्या खातेदारांसाठी अधिक फायेदशीर ठरेल, ज्यांचा डिजिटल व्यवहार अधिक आहे. तुम्ही पोस्ट खात्यातील इतर कोणत्याही बचत खात्यात रक्कम हस्तांतरीत कराल तर त्याचे कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पण पोस्ट सोडून इतर कोणत्याही खात्यात रक्कम हस्तांतरीत कराल तर मात्र शुल्क द्यावे लागेल. या खात्यात निवृत्तीधारकांना त्यांचे हयात प्रमाणपत्र, लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
शुल्क किती लागेल?
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रीमियम बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट खात्यात जावे लागेल. पोस्टमन अथवा ग्रामीम डाक सेवेच्या माध्यमातून तुम्ही ही सेवा घेऊ शकता. खाते उघडू शकता. या खात्यासाठी दरवर्षी तुम्हाला दरवर्षी 99 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तर खाते उघडण्यासाठी 149 रुपये आणि जीएसटी लागेल. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची, बँलन्सची कोणतीही अट नाही.