Ration card news update 2023 | फक्त शंभर रुपयात मिळवा. | आनंदाचा शिधा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला हा मोठा निर्णय.
शंभर रुपयांमध्ये कोणकोणत्या गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.
केसरी कार्ड धारक अर्थात शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, तसेच एक लिटर पामतेल असा संपूर्ण आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील एक महिनाभर ही योजना सुरू राहील. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंतोदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्र रेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. ई – पोसद्वारे शंभर रुपये प्रति संच असा सवलतीच्या दरात हा शिधा दिला जाईल हीच पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता काय प्रक्रिया आहे ?
हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महा टेंडर्स या ऑनलाइन पोर्टल द्वारे ही प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच 21 दिवसांऐवजी पंधरा दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त सिद्धांत खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 रुपये प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.