Saha Lakh Shetakaryana Ajunahi Karjmafiche Paise Milale Nahi | सहा लाख शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचे पैसे मिळाले नाही |

Saha Lakh Shetakaryana Ajunahi Karjmafiche Paise Milale Nahi | सहा लाख शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचे पैसे मिळाले नाही  :-

आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तात्कालीन युती सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंमलबजावणीच्या काळात आचारसंहिता सुद्धा लागू झाली परिणामी ऑक्टोंबर 2019 पासून शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी तयार करण्यात आली नाही. आता नव्याने सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या काळात तरी कर्जमाफीला मुकलेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी त्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हावी अशी मागणी होत आहे. अद्याप त्यावर कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे कर्जमाफी विभागाने राज्य शासनाकडे याबाबतचा अहवाल वारंवार सादर केला आहे. परंतु अद्याप तरतूद करण्यात आली नाही कर्जमाफीच्या यादीत राज्यातील सहा लाख शेतकरी अडकले आहेत सरकारच्या तरी सुद्धा कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अजूनही करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांनी नव्याने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेतील शेतकरी आले नाही. त्यांची ग्रीन यादी लागलीच नाही. तब्बल तीन वर्षे लोटली तरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खातात पोहोचले नाही त्यामुळे शेतकऱ्यानी खंत व्यक्त केली.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.