सलोखा योजना महाराष्ट्र २०२२ : शेतकरी बांधवांच्या शेती विषयी व शेतीवरील ताबा अशा अनेक समस्या मिटवण्यासाठी सलोखा योजना ही सरकारने चालू केली आहे या योजनेला सरकारकडून मान्यता ही प्राप्त झाली आहे . शेतीमध्ये एका शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असे जर असेल तर ही योजना या शेतकऱ्यांसाठी राबविली जात आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतीवर वाद मोठ्या प्रमाणात आहेत , हेच मिटवण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली होती. वाद निर्माण करणे नोंदीमध्ये शासनाकडून झालेली चुकी किंवा शेतकऱ्यनचा प्रस्ताव अमान्य , चुकीची नोंद झाली असेल अशा प्रमाणावरूनच वाद वाढतात. हे वाद संपुष्टात यावे यासाठी सलोखा योजना हे सरकारने आणले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विरोधी शेतकरी यांच्याकडे जमिनीचा ताबा हा बारा वर्षा पासून असावा अशी एक अट योजनेत करण्यात आली आहे. या योजनेमध्ये प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करण्यात येणार आहे अशाच वेडी शेजारील शेताचे शेतकरी अशांशी पंचनामा वहीवर सही आवश्यक आहे . यासाठी तलाठी व गावातील नोंदीमध्ये याची नोंद करणे गरजेचे आहे.