Saykal Anudan Yojana Maharashtra 2023 | सायकल अनुदान योजना महाराष्ट्र २०२३

( सायकल अनुदान योजना महाराष्ट्र २०२३ ) विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता आठवी व बारावीपर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या मुली यांच्यासाठी सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे. आठवी ते बारावीपर्यंत शिकत असलेल्या मुलींना आता अनुदानाच्या स्वरूपामध्ये पाच हजार रुपये दिले जातील , आणि हे अनुदान सायकल खरेदी (Saykal Anudan Yojana Maharashtra 2023) करण्यासाठी मुलींना दिले जाणार आहे. जेणेकरून त्यांना शाळेमध्ये पैदल जाण्याची गरज भासणार नाही . शाळेमध्ये पैदल जाण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणी येतात त्यासाठीच शासनाने हा निर्णय घेतला आहे की आठवी ते बारावी पर्यंत शिकत असलेल्या मुलींना पाच हजार रुपये अनुदान देऊन त्यांना सायकल खरेदी करण्यासाठी द्यावे. मुलींना या योजनेचा लाभ हा दोन टप्प्यांमध्ये मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना 3500 रुपये मिळणार आहेत यानंतर दुसरा टप्पा देण्यात येईल त्यामध्ये त्यांना दीड हजार रुपये दिल्या जाणार आहेत आणि हे सर्व डीबीटी द्वारे केले जाणार आहे.
यासाठी पात्रता काय आहे चला तर खाली पाहूया.
यामध्ये लाभ घेणारी मुलगी ही आठवी ते बारावी यामध्ये शिक्षण प्राप्त करत असावी.
यासाठी मुलगी ही जिल्हा परिषद किंवा शासकीय किंवा शासकीय अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेत असावी.
जी मुलगी गावामध्ये राहते किंवा गावाच्या दूर राहते शाळेपासून दूर राहते अशा मुलींना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
मुलगी ही गरजू असावी .
मुलीच्या शाळा ते घर यामध्ये कमीत कमी पाच किलोमीटरचे अंतर असावे.
या सर्व डी असतील तरच मुलगी ही या योजनेचा लाभ घेऊ शकेल.

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

See also  EPS 95 higher Pension Yojana 2023 l  EPS 95 वाढीव पेन्शन योजना 2023 अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज.