Shabari Gharkul Yojana 2022-23 आदिवासी उपाय योजनेअंतर्गत राज्यामधील अनुसूचित जातीच्या ज्या लोकांना राहण्याकरता स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडामातीच्या घरामध्ये राहतात झोपड्यांमध्ये राहतात किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यामध्ये राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याकरता वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे.
बघा कोण करू शकतो अर्ज?
त्या अनुषंगाने 2022 – 23 या वर्षाकरिता राज्यासाठी 24 हजार 75 एवढे घरकुलाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. शबरी घरकुलासाठी वाढीव मागणी डिसेंबर 2022 च्या हिवाळी अधिवेशनात शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी खर्चास विधानसभेने मान्यता दिलेली आहे तरतूद लक्षात घेऊन सन 2022 23 करिता सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार जिल्हा निहाय राज्यासाठी एकूण 69 हजार 213 वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यास खालील अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून राज्य शासनाने आता मान्यता दिली आहे.