Shabri Gharkul Yojana 2022-23

Shabri Gharkul Yojana 2022-23

यांना मिळेल घरकुल

  • ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 20 हजार मर्यादित आहे. केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
  • आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
  • संदर्भ क्रमांक 13 येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के आरक्षण ठेवण्यात यावे यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
  • लाभार्थी निवड करताना लाभार्थ्याची प्रत्यक्ष तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड करावी.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

  • याव्यतिरिक्त संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदींचे पालन व याबाबत शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शासन नियमांचे व कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  • सदर शासन निर्णयान्वये जिल्हा निहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्ये जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वितरण करताना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसल्यास त्या तालुक्याचे उद्दिष्ट त्या जिल्ह्यांतर्गत पुनर्वितरित करण्याचे अधिकार हे वाचा एक मधील अनुक्रमांक पाच येथील दिनांक 15 / 3 / 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वय गठित केलेल्या जिल्हास्तरीय समितीस राहतील.
  • संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार व चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्याबरोबरच प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी न चुकता आयुक्त आदिवासी विकास आणि संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष यांनी एकत्रित रित्या शासनास सादर करावा.

3 फेब्रुवारी 2023 चा शासन निर्णय येथे क्लिक करून बघा