Shetkari Baatami 2023 | चार मित्रांनी अमेरिकेतील पीक महाराष्ट्रात आणलं आणि चांगल्या उत्पन्नाची हमी दिली, युट्युब वरून घेतले धडे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात मोरळ, भेंडी गाझी, बैरखेड आणि पिंजर या वेगवेगळ्या गावातील चार शेतकरी एकत्र आले. गजानन लक्ष्मणराव मार्गे, रवी मानतकर पाटील, ओम प्रकाश वानखडे पाटील, उदय पाटील ठाकरे अशी ही चारही शेतकऱ्यांची नावे असून हे चौघही चांगले मित्र आहेत. हे चौघही मूळ शेतकरी असून पारंपारिक पद्धतीने पिके घेतात. मात्र त्यातून बदलत्या वातावरणामुळे हवं तसं पीक मिळत नव्हतं. तसेच अनेकदा अतिवृष्टीचा फटका सुद्धा बसला. त्यामुळे शेतीचा मोठा नुकसान त्यांनी झेललं. शेती जवळ जंगल परिसर असल्यामुळे वन्य प्राण्यांचा त्रास पिकांना होतो. म्हणून या संकटांवर मात करण्यासाठी पारंपारिक पद्धती शेतीला फाटा देत नवीन पिकांकडे वळण्याचा त्यांनी निश्चय केला. या चौघांमध्ये उदय ठाकरे या शेतकऱ्याने चीया शेती संदर्भात युट्युब तसेच गुगल वरून माहिती गोळा केली. त्यांची कल्पना इतर गजानन, रवी आणि ओमप्रकाश यांना दिली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मध्य प्रदेशातील चीया लागवड भागात भेटी दिल्या. आणि सर्व शेती पद्धती समजून घेतल्या. गजानन मार्गे हे मूळ मोराळा गावातील रहिवासी आहेत त्यांच्याकडे 44 एकर शेती आहे. सुरुवातीला या शेतीत त्यांनी पारंपारिक पिके घेतली. त्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर यांचा समावेश होता परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे तेवढे उत्पन्न यातून मिळत नव्हते या शेतीला त्यांनी नवीन पीक उत्पादन घ्यावे असा निर्णय घेतला. आणि त्यामधून त्यांनीच या शेतीला सुरुवात केली. आधी त्यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये चियाची लागवड करण्याचा विचार केला. आणि दोन एकरीत अडीच किलो बियाणे मागवली. गजानन मार्गे यांनी नोव्हेंबर 2022 म्हणजेच रब्बी हंगामा ची लागवड केली. आज चिया शीड फुलोराला असून बियाणे भरणीवर आहेत. येत्या वीस दिवसात हे पीक पूर्णपणे तयार होणार असल्याचेही गजानन मार्गे यांनी सांगितले. दोन एकरात प्रत्येकी चार ते पाच क्विंटल पेक्षा जास्त उत्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकच नव्हे तर च्या बियाणाला मागणी चांगली असून 13000 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळू शकतो. असेही ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना शेती करिता नवा पर्याय मिळालेला आहे.